Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

Surgical strike 2: भारताच्या हल्ल्यात जैशचे तळ उद्ध्वस्त; २०० दहशतवादी ठार

Share
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने १२ मिराज २००० या लढाऊ विमानांद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सू्त्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने हाय अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासूनच सीमेवर लढाऊ विमानांचा आवाज येत होता अशी माहिती सीमेवरील स्थानिक भारतीय नागरिकांनीही दिली आहे.

मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. भारताच्या मिराज विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हे एअर स्ट्राइक केले आहे. या कारवाईत हवाई दलाने जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांचेही तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटेचे कंट्रोल रुम अल्फा- ३ हे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे समजते.

भारतीय हवाई दलाने मिराज २००० विमानांनी हे एअर स्ट्राइक केले असून १२ विमाने पाकिस्तानच्या हद्दीत गेली होती. सुमारे २१ मिनिटे भारताच्या विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी मारले गेल्याचे समजते.

या कारवाईनंतर पाककडून कोणतेही पाउल उचलल्‍यास त्‍याला जशाच तसे उत्‍तर देण्यासाठी भारतीय हवाई दल हाय ॲलर्टवर आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!