Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

Surgical Strike 2: दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरं हाय अलर्टवर

Share
नवी दिल्‍ली : भारताने काल, मंगळवारी (दि.२६) पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्‍या एअर स्‍ट्राईकनंतर देशाच्या ५ मोठ्‍या शहरांमध्ये हाय ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीर खोर्‍यात सक्रीय असलेल्‍या दहशतवाद्यांकडून देशात काही मोठी घटना घडवून आणण्यासाठी प्रयत्‍न होऊ शकतो. त्‍या पार्श्वभूमीवर देशातील अंतर्गत सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत.

पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील तीन शहरांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सैन्य दलाचे तळ, शस्त्रे यांवर विशेष नजर ठेवली जाते आहे. दहशतवाद विरोधी कारवाईसाठी सज्ज असलेली पथकंही शहरांमध्ये तैनात करण्यात आली आहेत अशीही माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते सुरक्षेबाबत काय तयारी झाली आहे, समजा एखादा हल्ला झाला तर काय करता येईल यासंदर्भातली चर्चा होणार आहे.

भारताच्या एअर स्‍ट्राईकच्या कारवाईनंतर देशातील दहशतवाद विरोधी पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. पंजाब सोबतच राजस्‍थानची सीमाही पाकिस्‍तान सीमेला लागून आहे. त्‍यामुह सध्याची परिस्‍थिती पाहता, एप्रिल महिन्यापर्यंत सायंकाळी ६ ते ७ वाजल्‍यानंतर आंतररांष्‍ट्रीय सीमेपासून ५ किलामीटरच्या परिसरात सर्वसामान्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!