अपघातानंतर हाताचा पंजा पोटासोबत शिवला

0

ब्राझिलमधील साओ लुगेरिओ येथे राहणाऱ्या कार्लोस मेर्योटोचे आयुष्य एका अपघातामुळे १८० डिग्रीत बदलले.

त्याचे झाले असे की एक वर्षापूर्वी प्लॅस्टिक टेबल वगैरे बनविणाऱ्या यंत्रावर काम करत असताना कार्लोसचा डावा पंजा अपघाताने यंत्रात ओढला गेला आणि हाताचा पंजा आणि बोटांचा चुराडा झाला.

त्याला जवळच्याच ओरलेन शहरातील सांता ओटीलिया रुग्णालयात दाखल केले. त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. हाताच्या शिरा आणि हाडे खराब झाली होती.

दुसरे कोणी डॉक्टर असते, तर त्याचा पंजा कापण्याशिवाय पर्याय नाही असेच सांगितले असते. पण येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. ब्रँडोव्ह यांनी एक आगळा निर्णय घेतला.

त्याच्या हाताच्या पेशी जिवंत राहाव्यात आणि त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्याचा पंजा शस्त्रक्रियेने चक्क त्याच्या उदराशी जोडण्यात आला. त्यामुळे हाताल रक्तपुरवठा होऊ शकला.

पुढे ४२ दिवस हा पंजा त्याच्या उदराशीच जोडलेला होता. कार्लोस म्हणतो की  पोटात मी हाताच्या बोटांची हालचाल करू शकत असे. मला फार विचित्र वाटत असे.

त्यानंतर पुन्हा त्याच्यावर शस्त्रक्रिया करून उदरापासून त्याचा हात विलग करण्या आला. आणि त्याच्या मांडीची त्वचा पंजावर बसविण्यात आली.

आता वर्षभरानंतर कार्लोसच्या हाताचा पंजा व्यवस्थित झाला आहे. तो रोजची किरकोळ कामे त्या हाताने करू शकतो. त्याचा पंजा आता बाँक्सिंग ग्लोव्ह घातल्यासारखा दिसतो.

त्याच्यावर उपचार करणारे डॉ. ब्रँडोव्ह म्हणतात की या पंजावर पुन्हा शस्त्रक्रिया करून त्याची बोटे अलग करण्यात येणार आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील हा नवखा प्रयोग होता आणि डॉक्टरांनीही यापूर्वी असा प्रयोग केला नव्हता. पण त्यामुळे कार्लोसचा पंजा कापण्यापासून वाचला हे ही नक्की.

LEAVE A REPLY

*