रोजगारासाठी स्थलांतरामुळे आदिवासी मुलांच्या शिक्षणावर गंडांतर

0

हतगड दि. ६ (वार्ताहर ) : सुरगाणा तालुक्यातील आदिवासीना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत असल्याने त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुरगाणा तालुक्यात १६८ महसुली गावे आहेत वाडया  पाडया धरल्या तर तीनशेच्या आसपास आहेत. या सर्व गावातून आदिवासी कुटुंब स्थलांतर होत असल्याचे दिसते.

बोरगांव, हतगड, साजोळे, नागशेवडी , शिंदे , पळसन , भवाडा , बाऱ्हे, उंबरठाण, बर्डीपाडा ,गोन्दुने आदी  गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्य करतो त्यांचा मुख्य व्यवसाय भात ,नागली ,शेती आहे .

मात्र या शेतीवर उपजीविका होत नसल्याने त्यांना रोजगारसाठी स्थलांतर करावे लागते.

सुरगाणा तालुका हे त्यांचे माहेर समजले जाते .तर दिंडोरी,पिंपळगाव ,निफाड ,लासलगांव,नाशिक,चांदवड ,हे आदिवासीचे सासर समजले जाते .म्हणून हे आदिवासी बांधव रोजगार साठी सासरवाडीला वर्षानुवर्ष जाण्याशिवाय पर्याय नसतो .

काही आदिवासी चे शेत जमीनी फॉरेस्ट प्लॉट आहेत .या जमिनीत वर्षाकाठी पाण्याअभावी एकदाच पीक घेतले जाते. त्यातही पाहिजे तसे धनधान्य उपलब्ध होत नाही व आर्थिक आवक नसल्याने त्यांना आर्थिक  तंगी ही सतावत असते.

त्यामुळे त्यांच्या गरजा भागत नाही .सुरगाणा तालुका माहेरी अपेक्षेप्रमाणे काम मिळत नाही. जर शासनाकडून काम मिळाले तर रोजगार हमी आणि पगार कमी अशी अवस्था असते .

त्यामुळे नागरिकांचे या कामाकडे दुर्लक्ष होते .व हे आदिवासी बांधव दिंडोरी ,निफाड ,चांदवड , पिपळगांव,शेजारच्या गुजरात मध्ये रोजगार खूप मिळतो आणि त्याचा मोबदला ही अपेक्षेप्रमाणे मिळतो.

त्यामुळे सुरगाणा तालुक्यातून बांधव स्थलांतर होत असून त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहेत .

बालके आंगणवाडी  आहार पासून वंचित राहतात. त्यामुळे येथील ग्रामीण भागातील मुले सर्वात जास्त अशिक्षित आहेत .

आदिवासी बांधव व त्यांचे मुलांचा विचार करून स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाने सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव।ना गाव।तच रोजगार उपलब्ध करून द्यावा व परवडेल अशी मजूरी द्यावी त्यामुळे बहुतेक कुटुंब परगावी जाणार नाही अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

*