Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : तान नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शिक्षकाचा मृत्यू.

Share

सुरगाणा : तालुक्यातील अंबाठा केंद्रातील ऊंबराचापाडा (को) येथील शिक्षक लक्ष्मण ऊलूशा गावित (५०) हे भावाकडे जात तान नदीत वाहून गेले. दरम्यान मंगळवारी (दि. ०९) कोठूळा गावानजीक मृतदेह आढळून आला आहे.

अधिक माहिती अशी कि, उबरचापाडा येथे शिक्षक असणारे लक्ष्मण गावित हे सुभाषनगर येथे राहणारा भाऊ हिरामण गावित यांच्याकडे (दि. ०८) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जेवणासाठी जात होते. रस्त्यात तान नदीचे पात्र पार करुन जात असतांना जोरदार आलेल्या पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून गेले. रात्रीची वेळ असल्यामुळे ग्रामस्थांच्या तसेच कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आली नाही.

दरम्यान सकाळी शोधाशोध सुरू केली मात्र लक्ष्मण कोठेच आढळून आला नाही. यावेळी कोठूळा गावानजीक नदीपात्रातील झाडा झुडपात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील यांनी पोलिसांना दिली. त्यावेळी लक्ष्मण यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवून लक्ष्मण यांचाच मृतदेह असल्याची खात्री केली आहे. सदर घटनेचा पंचनामा केला असुन पोलिस हवालदार झुरडे, सहारे हे पोलीस निरीक्षक दिलीपसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!