Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा तालुक्यात संततधार; अनेक गावांचा संपर्क तुटला

Share

सुरगाणा : गुजरात सिमेवरील अतिदुर्गम भागातील पिंपळसोंडचा संपर्क तुटला असुन अंबिकेची उपनदी असलेली भुतकुड्याची नदी व कुभांरचोंडची नदी याला पुर आल्याने पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी वारंवार संपर्क तुटतो. यामुळे या गावातील नागरिकांचे सर्वच व्यवहार ठप्प होतात. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयात येता येत नाही.

हा भाग तीव्र उताराचा समुद्र सपाटी लगतचा असल्याने तासभर जरी पाऊस झाला तरी फरशीवरुन पुराचे पाणी जात असते त्यामुळे रात्री अपरात्री एखाद्याला सर्पदंश झाला किंवा अपघातात गंभीर जखमी झाला तसेच आजारी रुग्णाला वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागतो.पुराचे पाणी ओसरे पर्यंत थांबावे लागते. प्रसुती असेल तर खुपच हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.

गत वर्षी याच मोरीवरून पंधरा ते वीस बक-या पुरात वाहून गेल्या होत्या. त्यांचे शव गुजरात हद्दीत मिळाल्याने नुकसान भरपाई मिळू शकली नाही. दरवर्षी या समस्यांना तोंड द्यावे लागते. काही वर्षां पुर्वी याच तिरावर दोन सर्पदंश रुग्णांना प्राण सोडावा लागला होता.

आमचा डांग लगतचा सिमेवरील भाग असुन अद्याप ही शासनाचे आमच्याकडे लक्ष नाही. विकास कुठे हरवला तो आमच्या पर्यंत अजून पोहचला नाही. आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते, पाणी, पुल या सोयी सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी उंच पुल होणे गरजेचे आहे.
-शिवराम चौधरी, माजी सैनिक पिंपळसोंड

सध्या पाऊस खूप जोरात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गातच बसवावे. अति पावसामुळे विद्यार्थी शाळेत येणे अडचणीचे असेल तर काही हरकत नाही. वातावरण बघुन विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्याचा निर्णय मुख्याध्यापक अथवा प्रशासनाने यांनी घ्यावा शिक्षकांनी सुद्धा प्रवास करताना स्वतःची काळजी घ्यावी. सुरक्षित प्रवास करावा.
-संजय कुसाळकर, गटशिक्षणाधिकारी सुरगाणा.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!