अतिदुर्गम भागातील रस्त्यांच्या विकासकामांना आ. गावित यांच्या उपस्थितीत प्रारंभ

0

सुरगाणा (प्रतिनिधी) ता. १८ : तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या उंबरपाडा (का) ते पिपळसोड रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाल्याने दळणवळणाची सोय होणार आहे.  आज या रस्त्यांच्या कामांना आ. जे.पी. गावित यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

यावेळी  व्यासपीठावर तहसीलदार  दादासाहेब गिते,गटविकास अधिकारी केशव गड्डापोड,   कार्यकारी अभियंता विजय पाटील, रामजी गावित,  हेमंत पाटील, चिंतामण गावित,  हेमंत वाघेरे, सुभाष चौधरी, सावळीराम पवार,  इंद्रजित गावित, ज्योती जाधव, विजय घांगळे,  सभापती सुवर्णा गांगोडे, प्रशांत देवरे, धर्मेन्द्र  पगारिया, सरपंच, उपसरपंच,  परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी गावित म्हणाले ‘ कामे ही आता ई- टेंडरिंग पद्धतीने  होत आहेत. जो स्वस्त निविदा भरतो त्यालाच काम मिळते.याबरोबरच कामाचा दर्जा राखला पाहिजे. लोक आता जागृत झाले आहेत लोकांनीच कामावर लक्ष केंद्रित करून कामे करून घ्यावीत. पुलाची कामे  करतांना चांगल्या दर्जाची वाळू वापरावी. सिमेंट  चांगले  वापरावे. अशी सक्त ताकीद  त्यांनी दिली.

बोरीपाडा येथे गावात दोन हायमास्ट दिवे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,  त्याचप्रमाणे निराधार वृद्धापकाळ योजनेचे लाखो रूपये बा-हे, उंबरठाण बँकेतून मिळत नाहीत. जनतेचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे. सरकारच्या नोटाबंदीची झळ आजही आदिवासींना सोसावी लागत आहे.

तसेच नदीजोड प्रकल्पात गुजरात राज्यातील होणारी सहा धरणे, सुरगाणा  तालुक्यातील अठरा धरणे  हि आदिवासींच्या जिवावर बेतणार असून आदिवासींची पिळवणूक सरकार करीत आहे. या बाबत कोणालाही  माहीती नाही. पेसा कायदा प्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र परवानगी न घेताच हुकूमशाही मोदींच्या राजवटीत सुरू आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

*