Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : अतिवृष्टी मुळे शाळा आणि अंगणवाडीचे छत कोसळले

Share

सुरगाणा : तालुक्यात चार ते पाच दिवसा पासुन संततधार सुरु असल्याने अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. दरम्यान अहमदगव्हाण येथे अतिवृष्टी मुळे जिल्हा परिषद शाळेचे व अंगणवाडीचे कोसळल्याची घटना घडली.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शाळा तसेच अंगणवाडीच्या छत व भिंती कोसळल्या. बुबळी केंद्रातील अहमदगव्हाण जिल्हा परिषदेची शाळा व एकात्मिक बालविकास विकास प्रकल्पाची अंगणवाडीच्या इमारतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन्ही इमारती रविवारी रात्री पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

यामध्ये शाळेची विट बांधकामाच्या भिंती कोसळल्या असुन तीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. यापैकी शाळेची इमारत ही तीस ते चाळीस वर्षांपुर्वीची इमारत होती, असे ग्रामस्थांनी सांगितले. शासनाने विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी वसंत चौधरी, केशव वाघमारे, रंजना पवार, मालती चौधरी, गोपाळ वाघमारे यांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!