बार्हे, सुरगाणा येथे कमी दाबाने वीजपुरवठा

0

सुरगाणा (प्रतिनिधी) दि. १२ : येथील बार्हे परिसरात गेल्या महिन्यापासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी मेटाकुटिला आले आहेत.

सध्या शेतकरी भात, नागली, वरई पिकांची आवनी करण्यात व्यस्त आहे. या भागातील बार्हे, गोपाळपुर, ठाणगाव,  बेडसे, अंबुपाडा ते खिर्डी भाटी ही गावे अतिदुर्गम आहेत.

गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या या गावांना ना- रस्ते, ना वीज अशी अनेक अडचणी आहेत.

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारींना पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे. बार्हे भागाला कोणीच वाली नाही असे शेतकरी म्हणत आहेत.

हा एकंदरीत 90 गावांचा परिसर असून येथे ननाशी वीज केंद्रावरून वीज जोडली आहे.  त्याच्या देखभालीची जबाबदारी सुरगाणा विद्युत केंद्राची आहे. तेथे एकच कर्मचारी असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

LEAVE A REPLY

*