Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सुरेश दादा जैन नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल; पुढील उपचारासाठी मुंबईला हलवले

Share

नाशिक | प्रतिनिधी

जळगाव घरकुल घाेटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आलेले सुरेश दादा जैन नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आज त्यांच्या छातीत दुखू लागल्याने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.  याआधी जैन यांच्या हृदयावर शस्रक्रिया झाली असल्याने त्यांच्या अधिक तपासण्या करणे आवश्यक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त सिव्हील सर्जन निखील सैंदाणे यांनी देशदूतशी बोलताना दिली.

अधिक माहिती अशी की, जळगाव घरकुल घाेटाळाप्रकरणी धुळे विशेष न्यायालयाने ३१  अाॅगस्ट रोजी  ४८ आराेपींना शिक्षा सुनावली. त्यानंतर आराेपींना जिल्हा कारागृहात नेण्यात आले असून याठिकाणी आरोपी शिक्षा भोगत आहेत.

यामध्ये प्रमुख आराेपी तथा माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह इतरांचा समावेश आहे. सुरेश जैन यांना सात वर्षे कारावास व १०० काेटींचा दंड सुनावण्यात आला आहे.

आज सायंकाळी चार ते सव्वाचारच्या सुमारास जैन यांच्या छातीत दुखू लागल्याने कारागृह रुग्णालयाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सुरेश जैन यांना मुंबईला हलवले

त्यांच्या छातीत दुखत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर येथील तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या यावेळी करण्यात आल्या. जैन यांना मधुमेहाचा अधिक त्रास होत असून त्यांचा रक्तदाब देखील वाढला आहे. तसेच त्यांच्या हृदयाची शस्रक्रियादेखील झालेली असल्यामुळे त्यांचा त्रास वाढल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, त्यांच्या अधिक तपासण्या होणे आवश्यक असून त्यांना त्यासाठी मुंबईतील जे जे किंवा, केईएम रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठवणार असल्याची माहिती अतिरिक्त सिव्हील सर्जन निखील सैंदाणे यांनी दिली आहे.

मुंबईला पाठविण्याआधी जैन यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येणार आहे. याठिकाणी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुढे त्यांना रुग्णवाहिकेने मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!