Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

सुरत : गणेशमूर्ती आणत असतांना दहा युवकांना विजेचा धक्का; दोघांचा मृत्यू

Share

सुरत : सुरत येथील अंकलेश्वर येथे गणेश मूर्ती आणत असतांना दहा युवकांना करंट लागून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (दि. २७) दुपारी ही घटना घडली. अमित सोळंकी आणि कुणाल पटेल अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी कि, सुरतहून खरेदी करून आणलेली गणेशमूर्ती आदर्श मार्केट भागात १५-२० युवक घेऊन येत होते.

दरम्यान मूर्ती २० फूट उंच असल्याने रस्त्यावरील तारांना लागल्याने हा अपघात झाला. यामध्ये १० युवकांना साधारण धक्का बसला. परंतु दोन जण जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!