Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

युतीचा वचननामा म्हणजे गाजरांचा पाऊस – सुप्रिया सुळे

Share

मुंबई – भाजपा-शिवसेना युतीचा वचननामा म्हणजे गाजरांचा पाऊस आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली. त्यांना डेंग्यू झाल्याने त्या इतके दिवस प्रचारासाठी उतरल्या नव्हत्या. गुरूवारी त्या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या असून त्यांनी भाजपा आणि शिवसेनेवर निशाणा साधला.

शरद पवार यांच्यावर होणार्‍या टीकेबाबत विचारलं असता, मागील पाच दशकांपासून शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे त्याचमुळे त्यांंच्यावर टीका केली जाते असंही सुळे म्हणाल्या. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली. काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्यात आल्याचं देशातले नेते सांगत आहेत. त्याबाबत केंद्राचं अभिनंदन मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत हा मुद्दा का आणत आहात ? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

सुळे यांना 10 रुपयात थाळी आणि 5 रुपयात थाळी याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे म्हणजे गाजरांचा पाऊस आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम अतिआत्मविश्वासात वावरत असतात. या खेपेला परिवर्तन नक्की होणार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!