Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

सुप्रिया सुळे यांचे भावनिक ट्विट; माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होते

Share

मुंबई | प्रतिनिधी 

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

यापार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक ट्विट केले असून माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…!   आज तुम्ही शपथविधीप्रसंगी पाहिजे होतात. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या,  आज तुमची खूप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होता. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल, अशी भावनिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

आज सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनीही या आघाडी सरकारसंदर्भात ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. ट्विट करत त्या म्हणाल्या की, आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू असे त्या म्हणाल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!