Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

माझ्याविरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा – सुप्रिया सुळे

Share

सोलापूर – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी, असे सरकारला आव्हान दिलं आहे. मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहात, मात्र जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर आवाज उठवणार का? मी म्हणते की मला ईडी किंवा सीबीआयची नोटीस पाठवूनच दाखवावी, मी चॅलेन्ज देते. मी जर काही केलंच नाही तर मला कशाची नोटीस पाठवणार. सुरुवातीला थोडासा त्रास होईल. मात्र शेवटी मीच जिंकणार, असं म्हणत सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे संवाद ताईंशी या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौर्‍यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला. विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरु असलेल्या ईडीच्या चौकशीवरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आपल्याला ईडी सीबीआयने नोटीस पाठवली तरी मला पर्वा नाही. मला संघर्ष करण्यास मजा येते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.

पक्ष सोडणार्‍या नेत्यांवरही निशाना –

सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून भाजप, शिवसेनेत जाणार्‍या नेत्यांवरही टीका केली. जे कोण पक्ष सोडून जात असतील त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. मात्र अनेक वर्ष सोबत असलेले सहकारी सोडून जात असल्याचं दु:खही आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यंदाच्या निवडणुकाच्या निकालाची मला प्रचंड उत्सुकता असून पक्षांतर केलेल्या लोकांना तिकडे किती मत मिळतात, हे पाहायचं असल्याचेही सुळे यांनी म्हटलं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!