Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Political Crisis : ठाकरे गटाची 'ती' मागणी न्यायालयाने फेटाळली, पुढील सुनावणी...

Maharashtra Political Crisis : ठाकरे गटाची ‘ती’ मागणी न्यायालयाने फेटाळली, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

दिल्ली | Delhi

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेले तीन दिवस सुप्रीम कोर्टात युक्तिवाद झाला. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून तिन्ही दिवस युक्तिवाद करण्यात आला.

- Advertisement -

या युक्तिवादात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. त्यानंतर आता सुप्रीम कोर्ट या प्रकरणी महत्त्वाचा निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढी ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी पासून होणार आहे.

सत्ता संघर्षाचं हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? याबाबत आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे गेलं तर सुनावणी आणखी लांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सध्या हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच सुनावणीसाठी असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या