Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

दिवाळीत फक्त २ तास फटाके फोडण्यास परवानगी

Share

 नवी दिल्ली : दिवाळी तोंडावर आलेली असताना फटाक्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी रात्री फक्त २ तासांची परवानगी दिली आहे. रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडावेत असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने फटाक्यांच्या विक्रीवर सरसकट निर्बंध घातले नाहीये, मात्र ऑनलाईन विक्रीवर पूर्ण बंदी घातली आहे. फटाके विकणाऱ्यांना परवाना घ्यावा लागेल, परवाना असलेले विक्रेतेच फटाके विकू शकतील असं आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.

दूषण रोखण्यासाठी फटाक्यांच्या विक्रीवर देशव्यापी बंदी घालण्याची याचिका न्यायाधीश ए. के. सिकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर आली होती. त्यावर आज हा निर्णय देण्यात आला आहे. फटाके विक्रेत्यांचा रोजगाराचा मूलभूत अधिकार आणि देशातील १.३ अब्ज लोकांच्या आरोग्याचा अधिकारासहीत विविध गोष्टींना ध्यानात घेऊनच त्यावर निर्णय देण्यात येणार असल्याचं या खंडपीठाने २८ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केलं होतं.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!