सर्वोच्च न्यायालयाने आधार लिंक करण्याची मुदत वाढवली

0
नवी दिल्ली : जर तुम्ही आतापर्यंत तुमचे आधार कार्ड बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्डला लिंक केले नसेल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड लिंक करण्याची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यासंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी आधारकार्ड लिंक करण्याची मुदत पुढील सुनावणी होईपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले. यापूर्वी आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती.

मोबाईल नंबर, बँक अकाऊंट आणि इतर सर्व सार्वजनिक सेवांसाठी आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा मुदतवाढ देत सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला. पॅन कार्ड आणि बँक अकाऊंटसोबतच मोबाईल नंबर, शेअर स्टॉक्स, क्रेडिट कार्ड, एलपीजी कनेक्शन, इन्शुरन्स, पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, म्युच्युअल फंड आणि इतर सुविधांसाठी आधार लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं होतं. त्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत होती.

आर्थिक तसंच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणे सरकारने बंधनकारक केले आहे. गुंतवणुकीपासून ते बँक अकाऊंटचा वापर करण्यासाठी तसंच मोबाइल फोन वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. बँका, मोबाइल नेटवर्किंग कंपन्या तसंच इतर अनेक ठिकाणांहून ग्राहकांना आधार लिंक करण्याचे अलर्टही यायला सुरूवात झाली आहे.

आधार कार्ड संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सरकार आधार कार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांवर दबाव आणू शकत नाही असेही स्पष्ट केले. आधार कार्ड संबंधी सुनावणी करणाऱ्या घटनापीठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.के. सिक्री, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*