Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; अपात्र आमदारांना निवडणूक लढता येणार; ही घातली अट

Share

वृत्तसंस्था : कर्नाटकातील 17 बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असून या आमदारांना पोटनिवडणूक लढता येणार आहे. मात्र, तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरविलेला निर्णय योग्य असल्याचे सुप्रीमकोर्टाने म्हटले.

कर्नाटकमधील बंडखोर १७ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. याविरोधात 17 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

यामध्ये न्या. एन.व्ही. रमण, न्या. संजीव खन्ना आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली होती. सुनावणीचा निकाल आज देण्यात आला.

यात सुप्रीम कोर्टाने तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी 17 आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. मात्र, आमदारांना विधानसभेची मुदत संपेपर्यंत अपात्र ठरवता येणार नाही, असे सांगत त्यांना पोटनिवडणूक लढण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

कर्नाटकातील कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि जनता दल आघाडी सरकारचा 17 आमदारांनी पाठिंबा काढून घेतला होता. परिणामी आघाडीचे सरकार कोसळले. या आमदारांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे तत्कालीन विधानसभा अध्यक्षांकडे सोपविले होते.

अपात्र आमदारांमुळे रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांत 11 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 18 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!