राम मंदिर नक्की होणार, कारण सुप्रीम कोर्ट आमचंच’ – भाजप आमदार

0

लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘राम मंदिराचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय हे आमचेच आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य वर्मा यांनी केले आहे. वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केलं असून त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुकुट बिहारी वर्मा हे उत्तर प्रदेशच्या कैसरगंज येथून आमदार आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘भाजपा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आहे, पण राम मंदिर नक्कीच बनेल कारण आम्ही राम मंदिराबाबत कटिबद्ध आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचं आहे. यापूर्वी खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर वेळेवर बांधलं जाईल, नियतीत जे असेल ते कोणीही टाळू शकत नाही, असं विधान केलं होतं. तर येथील उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी राम मंदिराचा मुद्दा जर चर्चेने सोडवला गेला नाही तर संसदेत कायदा बनवून राम मदिर उभारण्याच्या दिशेने पावलं टाकू, असं म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

*