Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यासर्वाेच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना मोठा दिलासा

सर्वाेच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना मोठा दिलासा

मुंबई | Mumbai

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना न्यायालयाने आज पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या जामीनाच्या निर्णयाच्या विरोधात ईडीने (ED) सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे…

- Advertisement -

गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुख यांना कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर गेल्या ११ महिन्यांपासून ते ईडीच्या कोठडीत होते. यादरम्यान, त्यांनी जामिनासाठीही (Bail) प्रयत्न केला होता, पंरतु त्यांना जामीन मिळू शकला नव्हता.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांच्या जामीन अर्जावर ४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. पंरतु या निर्णयाविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तसेच कालच अनिल देशमुख यांनी वैद्यकीय उपचारासाठी (Medical Treatment) रुग्णालयात जाण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयाकडे मागितली होती. त्यांची ही मागणी मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केली होती. त्यानूसार जसलोक रुग्णालयात (Jaslok Hospital) त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या