Video : पुरवठा निरीक्षकाने रेशन दुकानदारांकडे मागितले पैसे; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात गुंतलेले?

0
नाशिक । रेशन दूकानदारांकडून नागरीकांचे आधार कार्ड गोळा करून त्याची संगणकात नोंद केली जात आहे. मात्र आपला डाटा एंट्री करण्यासाठी रेशन दूकानदारांकडून पुरवठा निरीक्षकाकडून पैसे मागितले जात असल्याची क्लिप फेसबुकव्दारे व्हायरल झाल्याने नाशिकचा पुरवठा विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सुरगाणा, वाडीवऱ्हे आणि नुकताच काही आठवडयांपूर्वी उघड झालेल्या जानोरी धान्य घोटाळयाप्रकरणी जिल्हयाचा पुरवठा विभाग चांगलाच चर्चेत आला. सुरगाणा धान्य घोटाळयाप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसतांना दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत असल्याने नाशिकचा पुरवठा विभाग कायमच चर्चेत राहीला आहे.

आज पुन्हा एकदा एका प्रकरणात हा विभाग चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये पुरवठा निरीक्षक थेट वरती पैसे पाठवावे लागतात अशी बतावणी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक मोठे मासे अडकले असल्याचेच या चित्रफितीतून दिसून येत आहे.

पुरवठा विभागाच्या कारभारात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने पुरवठा विभागाने काही पावलं उचलली आहेत यात रेशनधारकांचे आधार कार्ड गोळा करून त्याची माहीती ऑनलाईन भरली जात आहे. हे आधार कार्ड रेशन कार्डाला लिंक करून यापूढे पॉस मशिनव्दारे अंगठयाचा ठसा घेउन लाभार्थ्याला धान्य वितरीत केले जाणार आहे. या कामाकरीता प्रत्येक तहसिल स्तरावर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

याकरीता शासनाकडून निधी देण्यात येत आहे. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडीओत पुरवठा निरीक्षक या कामासाठी रेशन दूकानदारांकडून पैसे मागत असल्याचे दिसून येते. याशिवाय आधारकार्डाची नोंदणी करण्यासाठी पैसे देणार नसाल तर तुमचा ‘डाटा फ्रीज’ करून टाकतो असा दम देतानाच, दुकानदारांकडे पैसे मागत असताना निरीक्षकाने ‘गेल्या वेळी मला एक लाख, 60 हजार रूपये भरावे लागले’ असे सांगतानाही दिसत आहे.

ही चित्रफित सर्व दुकानदारांपर्यंत पोहचविण्यात आली आहे. सदरील चित्रफित संबधितांकडून डिलीट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. ज्या निरीक्षकाने दूकानदारांकडे पैसे मागितले त्या निरीक्षकाविरोधात यापूर्वीही वरीष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्याचे समजते. मात्र पुरवठा विभागाकडून सदरील व्यक्तीस पाठीशी घातल असल्याने अधिकारी आणि कर्मचारयांची भ्रष्ट युतीचा संशयही काहींनी व्यक्त केला आहे. त्यामूळे या चित्रफीतीप्रकरणी प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

*