Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

बिअर ग्रिल्ससोबत ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’मध्ये झळकणार सुपरस्टार रजनीकांत

Share

मुंबई :

आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजातून करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सुपरस्टार रजनीकांत लवकरच “मॅन व्हर्सेस वाइल्ड” या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत दिसणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये बांदीपूरच्या जंगलात रजनीकांत आणि बेअर ग्रिल्सचे हे अँँडव्हेंचरचे चित्रीकरण होणार आहे.

बेअर ग्रिल्ससोबत सुपरस्टार रजनीकांत यांच्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “मॅन व्हर्सेस वाइल्ड”मध्ये अँँडव्हेंचर केले आहे. पंतप्रधान मोदी मागील वर्षी 12 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’च्या एपिसोडमध्ये बेअरसोबत उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट जंगलात गेले होते.

त्या दोघांच्या एपिसोडची प्रचंड चर्चा जाहली होती. बिअरने मॅन वर्सेज वाइल्ड शो दरम्यान पंतप्रधानांना भाला दिला, तेव्हा मोदी म्हणाले, कोणा विरोधात हिंसा करणे माझ्या संस्कारात बसत नाही. बिअर ग्रिल्ससोबत यापूर्वी अमेरिकेचे पंतप्रधान बराक ओबामा यांनी देखील भाग घेतला आहे. त्याशिवाय हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी बिअरसोबत अँँडव्हेंचर केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!