Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक शहरात ‘तो’ कानठळ्या बसवणारा आवाज कसला? जाणून घ्या कारण

Share
Supersonic air craft testing hyper sonic voice in nashik breaking news

नाशिक | प्रतिनिधी

आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरात मोठा आवाज झाला होता. अनेकांनी या आवाजाबाबतचे कुतूहल सोशल मीडियात व्यक्त केले. आवाज ऐकला होता का? याबाबत अनेकांनी विचारणाही केली. सगळेच जण आवाजाबाबत अनभिन्न होते. आवाजावरून सोशल मीडियात वेगवेगळी कारणे व्हायरल झाली होती. मात्र, हा आवाज ओझर येथे असलेल्या HAL कंपनीमध्ये लढाऊ विमानाच्या चाचणीदरम्यान झाला असल्याचे नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तेव्हा या आवाजाचे गूढ उकलले.

एचएएल कंपनीमध्ये लढाऊ विमाने तयार केली जातात. त्यामुळे या विमानांची चाचणी परिसरात होत असते. बऱ्याचदा नाशिक शहराच्या वेशीपर्यंत ही विमाने आकाशात घिरट्या घालताना नजरेस पडतात.  आज यातीलच काही विमानांची चाचणी ओझरमधील एचएएलच्या परिसरात पार पडली. यावेळी हवेचा दाब तोडल्यानंतर कानठळ्या बसवणारा आवाज ओझरच्या पंचक्रोशीत ऐकू आला. नाशिक शहरातही वेगवेगळ्या भागात हा आवाज ऐकू आला.

सध्या संचारबंदी सुरु असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अनेकांची कामे घरून सुरु आहेत. यामध्ये संपर्काचे माध्यम केवळ सोशल मीडियात आणि फोन एवढेच उरले आहे. यादरम्यान, नाशिककरांना एकमेकांना संदेश, फोन स्वरुपात संपर्क करून अचानक झालेल्या आवाजाबाबत विचारपूस केली. यावेळी फक्त आवाज ऐकू आला, कसला आला, कुठून आला कुनलही माहिती नव्हते.

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून सुपरसॉनिक विमानांची चाचणी केल्यामुळे हा आवाज झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

माहितीगारांच्या म्हणण्यानुसार, हा आवाज ध्वनीच्या गतीपेक्षा पाच पटहून अधिक असतो. या आवाजाला बर्‍याचदा हायपरसॉनिक म्हणूनदेखील ओळखले जाते. विमानातून चाचणीदरम्यानचा ध्वनी लवचिक माध्यमात प्रेशर वेव्हच्या रूपात प्रवास करीत असतो. हवेत ध्वनी वेगवेगळ्या वेगाने रेखांशाचा प्रवास करते.

पाण्याच्या तपमानावर सुपरसोनिक वेग 1,440 मीटर म्हणजेच 4,724 फूट / से पेक्षा जास्त वेग मानला जाऊ शकतो. घनरूपांमध्ये, ध्वनी लाटा रेखांशाच्या किंवा ट्रान्सव्हर्सली ध्रुवीकरण केल्या जातात. यापेक्षाही अधिक हा आवाजाचा वेग असतो. त्यामुळे साहजिकच कानठळ्या बसवणारा आवाज होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!