Type to search

Featured सार्वमत

पोलीस अधीक्षकांचा सुविधांबाबत ‘अल्टिमेटम’

Share

मनपासह विविध खात्यांच्या अधिकार्‍यांची बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – नागरी सुविधांवर पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन अल्टिमेटम दिला आहे. पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचारी सुनील कुर्‍हे यांची मुलगी पूजा हिचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस मुख्यालयातील नागरी सुविधांची शुक्रवारी दुपारी पाहणी केली. या पाहणीत अनेक गंभीर बाबीसमोर आल्या. त्याची तातडीने दखल घेत सिंधू यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली.
महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. इशू सिंधू यांनी या बैठकीत या विभागाच्या अधिकार्‍यांना पोलीस वसाहतीतील नागरी सुविधांचा उडालेला बोजवाराची माहिती दिली.

या नागरी सुविधांवर तातडीने काम करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांना टाईम लिमिट दिले आहे. पोलीस वसाहतीमधील जीर्ण झालेल्या विद्युत वाहिनीच्या तारा दोन दिवसात बदलण्याबरोबरच वाकलेले वीजखांब, तारांवर चाललेल्या झाडांच्या फांद्या काढण्याच्या सूचनाही इशू सिंधू यांनी केल्या आहेत. पोलीस वसाहतीमधील नाला आणि गटार यांची मोठी दुरवस्था झाली आहे. वसाहतीतील पोलिसांच्या घरासमोर नाल्या आणि गटारी तुंबल्या आहेत. त्या स्वच्छ करून त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकार्‍यांवर सोपवली आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सात दिवसाचा वेळ दिला आहे.

या बैठकीत पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी काम केले की नाही याचीही तपासणी होणार आहे. त्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वसाहतीतील नागरी सुविधांच्या कामकाजाचा आढावा स्वतः मिटके घेऊन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना सादर करणार आहे. पोलीस दलाच्या आक्रमक भूमिकेमुळे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!