Thursday, May 2, 2024
Homeनगरडॉ. पंजाबराव उगले यांना अपर पोलीस आयुक्तपदी पदोन्नती

डॉ. पंजाबराव उगले यांना अपर पोलीस आयुक्तपदी पदोन्नती

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील देवसडे (Devsade) येथील रहिवाशी व ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभगाचे (Thane Bribery Prevention Division) पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले (Superintendent of Police Dr. Punjabrao Ugale) यांना पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर अपर पोलीस आयुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे.

- Advertisement -

डॉ.उगले यांनी यापूर्वी नाशिक, जळगाव व ठाणे येथे पोलिस अधिक्षक पदावर उठावदार कामगिरी केली. एक कर्तव्यतत्पर आयपीएस अधिकारी म्हणुन ते पोलिस खात्यात परिचित आहेत. नाशिक व ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणुनही डॉ. उगले यांची कारकिर्द उल्लेखनिय व पोलिस यंत्रणेची शान वाढविणारी ठरली.

बुधवार दि. 8 जून रोजी सुधारीत पदस्थापनेत डॉ. उगले यांना पोलिस अधिक्षक पदावरुन अपर पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. श्री उगले यांचेसह राजेंद्र माने व दत्तात्रय शिंदे या एसपींनाही पोलिस उपमहानिरीक्षकपदी सरकारने पदोन्नती दिली आहे. डॉ. उगले यांची पदोन्नती झाल्याचे कळताच नेवासा तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या