हृतिकच्या ‘सुपर 30’ चा पोस्टर रिलीज

0

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ चे पहिले पोस्टर आज रिलीज करण्यात आले. या चित्रपटात हृतिक गणिताच्या शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टर सोबत ”अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा.. अब राजा वही बनेगा दो हकदार होगा!” अशी टॅग लाईन देखील शेअर करण्यात आली आहे.

‘सुपर ३०’ ची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर हृतिकने ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये हृतिक एका वेगळ्याच अंदाजामध्ये झळकला असून त्याच्या डोळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचवण्याची जिद्द दिसून येत आहे. त्यामुळे हा फोटो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

हृतिक लवकरच ‘सुपर 30’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिक्षक गणितज्ज्ञ आनंद कुमार व त्यांच्या 30 विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे. बिहारच्या एका खेडेगावातील विद्यार्थ्यांची आईआईटी-जेजई सारख्या कठीण परीक्षेची तयारी गणितज्ज्ञ आनंदकुमार यांनी कशाप्रकारे घेतली. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील दिसणार आहे.  ‘सुपर ३०’ हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

LEAVE A REPLY

*