Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

सुपा: धाब्यावर डान्सबार; सात महिलांसह 15 जण ताब्यात

Share

सुपा (वार्ताहार)-  पुणे हायवेवरील जतेगाव घाटाजवळील हॉटेलवरच बेकायदेशीर डान्सबार चालू होता. पोलिसांच्या छाप्यात सात महिलांसह एकूण 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नगर-पुणे हायवेवरील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसलेल्या जातेगाव घाटातील हॉटेल जयराज येथे बेकायदा डान्सबार चालू होता. या घटनेची माहिती खबर्‍याकडून जिल्हा पोलीस आधीक्षक ईशू सिंधू यांना मिळताच त्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला आसता त्या ठिकाणी काही महिला संगीताच्या तालावर नाचताना तर काही पुरुष त्यांना प्रतिसाद देत चित्रविचित्र हावभाव करीत आसलेले आढळून आले.

पोलिसांनी कारवाई करीत सात महिलांसह संजय विठ्ठलराव जाधव रा. गंगापूर, प्रशांत आबासाहेब पाटील रा. गंगापूर, अजित गुंडोपंत कदम लोहगाव, कृष्णा सूर्याजी तोबरे रा. लातूर, संदीप देविदास साबणे रा. गगांपूर, सय्यद नसीर सय्यद इस्माईल रा. गंगापूर, अमोल सुभाषराव वरकड, रा. गंगापूर, सारंगधर शंकरराव जाधव कासोडा रा. गंगापूर, प्रदीप सत्यनारायण नवदर रा. गंगापूर, वाल्मीक विठ्ठल शिरसाठ रा. गंगापूर, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर हॉटेल चालक नितीन शेट्टी व हॉटेल मालक राजेंद्र सातव फरार झाले आहेत. या सर्वांवर भादवि कलम 294, 34 महाराष्ट्र हॉटेल उपाहारगृह आणि मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 चे कलम (1) (4)(6) प्रमाणे पो. कॉ यंशवत भानुदास ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना सुपा पोलीस स्टेशनला आणले आहे.

आरोपी खोटी माहिती देत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होऊन गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला असे सुपा पोलिसांकडून सांगण्यात आले. हॉटेलमधील डान्सबारवर छापा पडताच परिसरात एकच खळबळ उडाली. छाप्याची माहिती मिळताच अनेकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या बेयकायदेशीर धाडसी गैरकृत्याला कुणाचे पाठबळ आहे व यात आणखी कोण कोण अडकले आहे याची परिसरात चर्चा रंगू लागली आहे. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र भोसले करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!