Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सुपा बसस्थानक चौकात अपघात एक ठार; एक जखमी

Share

सुपा (वार्ताहर)- अहमदनगर पुणे महामार्गावर सुपा बस स्थानक चौकात जे.सी.बी. मशीन व कंटेनर यांच्यात धडक होऊन दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तींच्या अंगावर जाऊन त्यात एक ठार तर एक जखमी झाला.

अहमदनगर- पुणे महामार्गावरील सर्वात धोकादायक ठिकाण असलेल्या सुपा बस स्थानक चौकात सोमवारी सकाळी 9 ते 9.30 दरम्यान एक जे. सी.बी. मशीन पारनेरकडून चौक ओलांडून पुण्याकडे वळत असताना तेवढ्यात अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने एक कंटेनर क्र. MH 20 DE 1553 हा जोरात येत होता. ऐन चौकात जे. सी. बी. व कंटेनर याची जोरात धडक होऊन दोन्ही वाहने रस्त्याच्याकडेला असलेल्या चहाच्या दुकानाकडे सरकली .त्यावेळी तेथे उभे असलेले नसिर अब्दुल शेख व संतोष यादव अवचिते यांच्या आंगावरती कंटेनर गेला. कंटेनरची धडक इतकी जोरात होती की त्यात नसिर अब्दुल शेख हे जागीच ठार झाले तर संतोष यादव औचिते हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात नेले.

याबाबत शौकत कादर शेख यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान जे. सी. बी. मशीन व कंटेनर यांच्या धडकेत रस्त्यावर उभे असलेले नसीर शेख हे जागीच ठार झाले तर संतोष औचिते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर जे.सी.बी. मशिनवाला पळून गेला आहे.

सुपा बस स्थानक हे मुत्यूचा सापळा बनले आहे. याठिकाणी या पूर्वीही अनेकांनी आपले जीव गमावले आहेत तर कित्येक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत दैनिक सार्वमतने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. या चौकांना उड्डाण पूल, भूयारी मार्ग किंवा सर्कल असावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!