दीड वर्षांपासून फरार सराईत किरण नागरेला ठोकल्या बेड्या

0
पंचवटी | दीड वर्षांपूर्वी हनुमानवाडीजवळ झालेल्या सुनील वाघ हत्या प्रकरणातील मुख्य संशयित सराईत किरण नागरेला सापळा रचून पोलिसांनी आज रात्री शिताफीने ताब्यात घेतले. नागरे गेल्या दीड वर्षांपासून फरार होता.

मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडीजवळ भेळभत्ता विक्रीचा व्यवसाय करणार्‍या सुनील वाघ व हेमंत वाघ यांच्यावर धारदार शस्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात सुनील वाघचा मृत्यू झाला होता तर हेमंत वाघ या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते.

दरम्यान, हा हल्ला टोळीयुद्धातून झाला होता. यामध्ये कुंदन परदेशी, राकेश कोष्टी, जया दिवे, व्यंक्या मोरे, अक्षय इंगळे, अजय बागुल यांच्यासह इतरांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेला किरण नागरे मखमलाबाद येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली. पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने नागरेला शिताफीने ताब्यात घेतले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

*