घरातले रुग्ण रुग्णालयात आणण्यासाठी प्रयत्न; मालेगावी आता चिंता ‘रोजी-रोटी’ची : सुनील कडासने

jalgaon-digital
4 Min Read

मालेगाव | हेमंत शुक्ला

अफवा, गैरसमज व अज्ञानामुळे संशयित रुग्ण उपचारासाठी बाहेर पडत नसल्याने येथे बाधित रुग्णांची संख्या तसेच करोणासह इतर वेगवेगळ्या आजारांनी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचे नागरिकांतर्फे बोलले जात आहे. त्यामुळे अफवा व गैरसमज दूर करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना तातडीने हाती घ्याव्या लागतील असे स्पष्ट करत उपचारासाठी जास्तीत जास्त संशयित रुग्ण घराबाहेर कसे पडतील यास आपण सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक व समन्वय अधिकारी सुनील कडासने यांनी ‘दैनिक देशदूत’शी बोलताना दिली.

समन्वय अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत सर्वप्रथम चर्चा केली. यानंतर करोना बाधित व संशयित रुग्णांचा उपचार होत असलेल्या मसगा संकुल, फरान रुग्णालय सहारा हॉस्पिटल मालेगाव हायस्कूल आदी ठिकाणी भेट देत पाहणी केली.

यावेळी बाधित रुग्णां बरोबरच काँरन्टाईन केलेल्या संशयित रुग्णांची थेट संवाद साधला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. करोना मुक्त झालेल्या रुग्णांशी देखील भेटून परिस्थिती जाणून घेतली. या शहराचे भले व्हावे या हेतूनेच आपण पुन्हा सेवेसाठी आलो आहोत. हे सर्वप्रथम स्पष्ट करत असल्यामुळे मनमोकळेपणे व्यथा मांडल्या जात आहे असे कडासने यांनी सांगितले.

दवाखाने बंद ठेवले गेले, डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला, स्त्रावचे अहवाल खूप उशिरा येतात उपचार केंद्रात चांगल्या सुविधा नाहीत शहरात अस्वच्छता आहे जंतुनाशक फवारणी सुद्धा केली जात नाही, करोना हा आजारच नाही आमची दिशाभूल केली जात आहे अशा विविध तक्रारी जनते तर्फे आपल्यासमोर मांडल्या जात आहे त्यामुळे त्यांचे समाधान व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. करोनाचा पादुर्भाव सुरू झाल्यावर लॉक डाऊन व भीतीमुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले त्यामुळे मधुमेह दमा किडनी उच्च रक्तदाब हृदयविकार आदी गंभीर आजारांनी बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी नाराजी नागरिकांतर्फे व्यक्त केली जात असल्याची माहिती कडासने यांनी दिली.

शहरात सर्व रुग्णालय सुरू असून डॉक्टरां तर्फे उपचारही केले जात असल्याचे दिसून आले आहे मात्र अफवा व गैरसमजामूळे संशयित रुग्ण घराबाहेर पडत नाही त्यामुळे शहरातील डॉक्टरांनी रुग्ण तपासणी तसेच उपचार होत असल्याबद्दल माहिती देत असलेला रुग्ण असे व्हिडिओ काढून ते जनतेत व्हायरल करण्याच्या सूचना आपण डॉक्टरांसह पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

यामुळे उपचार होत आहे हा संदेश जाण्याबरोबर डॉक्टरांवरील रील राग देखील शांत होऊ शकेल असा विश्वास कडासने यांनी व्यक्त केला. शहरातील करोना उपचार सेंटरमध्ये सर्व सुविधा असून जेवणाचा दर्जा देखील चांगला आहे. यासंदर्भात देखील जनतेला माहिती देत त्यांचे गैरसमज दूर करत आहोत. अफवा व गैरसमजातून निर्माण झालेली ही परिस्थिती ती शहराच्या हिताची नाही.

त्यामुळे मुस्लिम धर्मगुरू सामाजिक राजकीय कार्यकर्ते हे यांनी आपापल्या भागात जनजागृती रॅली काढाव्यात तसेच डॉक्टरांनी देखील खील आपल्या परिसरातून जास्तीत जास्त संशयित रुग्ण घरातून रुग्णालयात उपचारांत कसे दाखल होतील. याबाबत अधिक सक्रिय होत लक्ष देण्याची सूचना आपण डॉक्टरांना देखील केली आहे. लक्षणे दिसत असलेल्या रुग्णावर घरात उपचार होणे व प्रकृती गंभीर झाल्यावर त्यास रुग्णालयात नेणे हे रुग्णासह त्याचे कुटुंबीय व शहरासाठी निश्चित हिताचे राहणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण रुग्णालयात उपचारार्थ कसे दाखल होतील याकडे लक्ष देण्याचे आवाहन धर्मगुरू सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टरांना करत असल्याचे कडासने यांनी सांगितले.

रोजी रोटीचीच चिंता

करोना संकटामुळे गेल्या 53 दिवसापासून बंद असलेल्या यंत्रमागाचा फटका मजुर वर्गास बसत आहे. रमजान मुळे होत असलेल्या मदतीमुळे दिलासा मिळाला. मात्र पुढे काय हा प्रश्न मजुरांना संत्रस्त करून सोडत आहे. बंद यंत्रमागा मुळे रोजीरोटीची चिंता भेडसावत असल्यामुळे करोणा सारख्या महामारीस मजूर गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे आगामी काळात या वर्गाचा रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून शासनात लक्ष घालावे लागणार आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांचे यंत्रमाग सुरू झाले पाहिजे. याचा देखील विचार करावा लागणार आहे. शहरातील सद्यपरिस्थिती ती व जनतेची मानसिकता यासंदर्भात शासनास अहवाल पाठवणार असल्याचे कडासने म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *