‘माझा एल्गार’मध्ये सुनील भूमकर झळकणार

0
नाशिक । अभिनेता, लेखक, निर्माता आणि गीतकार सुनील भूमकर हे लवकरच प्रदर्शित होणार्‍या माझा एल्गार या चित्रपटात झळकणार आहेत.

भूमकर यांनी आतापर्यंत आहट, गृहस्वामीनी या मालिकेत यशस्वी भूमिका केली आहे. तसेच अनेक मराठी हिंदी चित्रपटातही ते झळकले आहेत.

‘माझा एल्गार’ हा चित्रपट सामाजिक कथानकावर आधारित आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या एका लहान मुलीच्या आयुष्यात एक अपघात होतो.

मोठेपणी ती सामाजिक कार्यकर्ती बनून त्याच गावात परतते आणि अनेकांचे आयुष्य बरबाद करणार्‍या महंतांसह त्याच्या साथीदारांविरोधात एल्गार पुकारते.

पुढे त्यात ती यशस्वी होते का? महंताचे काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हा पाहिल्यावर प्रेक्षकांना मिळतील.

याच चित्रपटात अभिनेते सुनील भूमकर यांनी एक दमदार आणि अनोखी भूमिका केली आहे. त्यांचा हा अभिनय पाहणे प्रेक्षकांसाठी वेगळाच अनुभव ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*