Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

Share

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे आयुक्त ओम प्रकाश रावत निवृत्त होणार असून त्यानंतर त्यांची जागा अरोरा घेणार आहेत. ते २ डिसेंबरला पदभार सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणुकीचे नियोजन त्यांच्या नेतृत्त्वाखाली होणार आहे.

अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८० च्या तुकीडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. विधी मंत्रालयाने सोमवारी अरोरा यांच्या नियुक्तीला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर परवानगीसाठी तो राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आला आहे. अरोरा यांच्या नियुक्तीच्या औपचारिक घोषणेची अधिसूचना लवकर काढण्यात येईल, असे मंत्रालयातील सूत्राने माहिती दिली.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!