नासाचे यान सूर्याकडे झेपावलं….

0

वॉशिंग्टन : नासाचे पार्कर सौर शोधक यान सूर्याच्या दिशेने झेपावले असून सूर्याच्या बाहेरील वातावरण, त्याचे अवकाशीय हवामानावर परिणाम याचा वेध सात वर्षांच्या मोहिमेत घेतला जाणार आहे. पार्कर सौर यान रविवारी अमेरिकेतील केप कॅनव्हराल एअर फोर्स स्टेशनच्या संकुल क्रमांक ३७ मधून अवकाशात झेपावले.

१०३ अब्ज डॉलर खर्च करून तयार केलेले हे यान काही दिवसांत सूर्याजवळ पोहोचेल. या यानातले आणि सूर्यातले अंतर केवळ चाळीस लाख मैल असणार आहे. सूर्याची उष्णता, सूर्याजवळील वातावरणात दररोज होणारे बदल,अंतराळातील हालचाली या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे जळून जायला नको म्हणून या यानात हिट शिल्डही बसवण्यात आलं आहे. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ यूजीन नेवमॅन पार्कर यांचं नाव या यानाला देण्यात आलं आहे. या यानाचा ताशी वेग ४ लाख ३० हजार किमी इतका असून २५०० डिग्रीची उष्णता झेलण्याची क्षमता या यानामध्ये आहे.

१९० किमी प्रतीसेंकद…..
अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ युजीन नेवमॅन पार्कर यांच्या नावावरून या मोहिमेचे नाव ठेवण्यात आले आहे. पार्करचा वेग १९० किमी प्रति सेकंद असून पृथ्वीवर याच वेगाने वाहन चालवले तर मुंबई ते दिल्ली हे अंतर अवघ्या ७ सेकंदात पार करता येईल. १३७१ डिग्री सेल्सियस एवढय़ा उष्ण तापमानाचा सामना करण्याची शक्ती पार्करमध्ये आहे. हे यान शनिवारीच झेपावणार होते, पण ऐनवेळी हेलियम अलार्म वाजला आणि उड्डाण थांबवण्यात आले.

LEAVE A REPLY

*