Type to search

Featured maharashtra आवर्जून वाचाच

आठवडाभर उन्हाचा ताप

Share

हवामान खात्याचा इशारा

मुंबई – राज्यातल्या बर्‍याच भागातील कमाल तापमानात रविवारपासून (19 मे) वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह नगरमध्ये आठवडाभर उन्हाचा ताप जाणवणार आहे. या काळात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबईतही उकाड्याची तीव्रता वाढणार आहे. मुंबईतील कमाल तापमानात 18 ते 21 मे दरम्यान वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात तापमान वाढणार असून अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोहचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!