‘सर्वाधिक वेगाने वाढणारी कंपनी’ म्हणून ‘सुला’चा गौरव

0
नाशिक । भारतीय आर्थिक विकास आणि संशोधन संस्था (इडरा)तर्फे सुला विनयार्ड्सला ‘सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतीय कंपनी’ म्हणून 2017 चा पुरस्कार मिळाला आहे. भारतात वाईन संस्कृती निर्माण करण्यात आघाडीवर असलेल्या या कंपनीने देशातील वाईन पर्यटनाचाही पाया घातला आहे.

आपल्या क्षेत्रातील सर्वोत्तम योगदान आणि यश याच्या माध्यमातून देशाच्या विकासाबद्दल असलेले आपले उत्तरदायित्व व्यक्त करणार्‍या संस्था-संघटना आणि व्यक्ती यांना या पुरस्काराचे सन्मानित केले जाते. वाईन उत्पादनात शाश्वततेच्या मुल्यांचा पाया घालणार्‍या, वाईन पर्यटनात देशात आघाडीवर असलेल्या, नाशिकला जगाच्या नकाशावर नेणार्‍या सुलाच्या प्रयत्नांची यानिमित्त पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे.

पुरस्काराविषयी बोलताना सुलाच्या जागतिक ब्रान्ड अ‍ॅबॅसॅडर सिसिलीया ओल्डन म्हणाल्या, सुलासाठी हा विलक्षण अभिमानाचा क्षण आहे.या अविश्वसनिय प्रवासात सदैव आची साथ देणार्‍या स्नेहींबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘गो ग्रीन’ या संकल्पनेचा गाजावाजा होवून ती लोकप्रिय होण्यापूर्वीच सुलाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राजीव सामंत यांनी आपल्या या कंपनीला ‘गो ग्रीन’ हा मंत्र दिला होता.

जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदल हे सध्याचे तातडीचे प्रश्न हाताळण्याचे उद्दीष्ट मनात ठेवून सुलाने शाश्वत विकास आणि त्याचसोबत सर्वोत्तम दर्जाची वाईन निर्माती हे आपले प्राथमिक ध्येय ठेवले आहे. कमीत कमी टाकावू, संसाधनांचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया याकडे कंपनीचे सतत लक्ष असून त्याखेरीज ठिबक सिंचन, सेंद्रीय खेते, गांडूळ खत, सौरउर्जा, हिट एक्सचेंजर अशा अन्य प्रणालींचा वापर जाणीवपूर्वक केला जात आहे.

या सर्व प्रयत्नामुळे सुला आज समाजात बदल घडवून आणण्याच्या निर्धार असलेला अनुकरणीय ब्रान्ड ठरला असून त्याच प्रयत्नांचा गौरव म्हणून ‘सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतीय कंपनी’ म्हणून सुलाला गौरवण्यात आले आहे. लवकरच सुला आपला विस्तार रशियामध्ये करणार असल्याची माहिती सुलातर्फे देण्यात आली.

LEAVE A REPLY

*