सुकाणू समितीची आज बैठक

0
संगमनेर (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांच्या मुलांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावर राज्यव्यापी लढा उभारण्यासंदर्भात आम्ही शेतकर्‍यांची पोरं विद्यार्थी संघटनांच्या सुकाणू समितीची शासकीय विश्रामगृृह संगमनेर येथे आज गुरुवार दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता बैठक आयोजित करण्यात येणा असल्याची माहिती सुकाणू समितीचे निमंत्रक लहानु सदगीर यांनी दिली.
या बैठकिमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर 25 जुलै रोजी प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणी मोठा मोर्चा काढून राज्यसरकारला मागण्यासंदर्भात 14 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आली आहे. राज्य सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत निर्णायक लढा कशा पध्दतीने करायचा याची रणनिती बैठकीमध्ये ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यी संघटनांच्या प्रतिनिधींनी, सामाजिक कार्यकर्ते यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सुकाणू समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*