विदयार्थी युवक सुकाणू समितीचा एल्गार

0

20 ऑगस्टला नगरला रास्तारोकोचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करत कर्जमाफीप्रश्‍नी आक्रमक भूमिका घेत राज्य सुकाणू समितीने सोमवारी (आज) राज्यव्यापी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मुलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 20 ऑगस्टला नगरला रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रविवार (दि.13) रोजी नगर शहारात माळीवाडा येथे विद्यार्थी युवक संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठक झाली. सुकाणू समितीच्या चक्काजामच्या पार्श्‍वभूमिवर तालुकानिहाय विद्यार्थी संघटनांच्या एकत्रित बैठका घेण्यात आल्या.शेतकर्‍यांच्या मुलांच्या विविध प्रश्‍नी रविवार 20 ऑगस्टला नगरमध्ये पत्रकार चौकात रास्तारोको करण्याचा निर्णय विदयार्थी युवक सुकाणू समितीने घेतला आहे.
दरम्यान बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज माफी, स्वतंत्र शिष्यवृत्ती, पोलिस व सैन्य भरतीच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, भारतीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाप्रमाणे वर्ग 3 व 4 च्या भरती प्रकियेच्या वार्षिक नियोजन प्रत्येक वर्षी निश्‍चित करावे, विविध परीक्षांचे शुल्क 50 रुपयांपैक्षा अधिक घेवू नये, परीक्षार्थीना परीक्षेच्या दिवशी रेल्वे व बसमधील प्रवासादरम्यान 50 टक्के सुट दयावी.
परीक्षा झाल्यानंतर भरती प्रक्रियेची (परीक्षा निकाल, मुलाखत, कागदपत्र पडताळणी) कार्यवाही तीन महिन्यात पूर्ण करावी.स्वतंत्र स्पर्धापरीक्षा मंडळ स्थापन करणे, वर्गनिहाय पुस्तके उपलब्ध करुन कमी शुल्क आकारावे, प्रत्येक तालुक्यात ग्रंथालय, मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका, वसतीगृह उभारावे, राष्ट्रीय बँकांचे कर्ज वितरण करावे, अ‍ॅकडमी व क्लासच्या विद्यार्थ्याना प्रवासासाठी सवलत दयावी, आदी मागण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.
यावेळी अजय महाराज बारसकर, लहानू सदगीर, राम शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. संतोष जावळे, एकनाथ जावळे, संदिप खरात, योगेश देव्हारे, सोमेश्‍वर राऊत, अंबादास खरात, सुनील कोंथबिरे, गणेश दिघे, पंढरी कुदनर, योगेश दातीर, प्रमोद मोदड आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.

शैक्षणिक कर्ज माफ करा –
जिल्हा उद्योग केंद्र, खादीग्रामोदयक आदी विविध महामंडळाचे कर्ज माफ करावे आदीसह इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्याना विनाअनुदानित महाविद्यालयात मोफत प्रवेश दया. 12 वी पर्यत मुलींच्या मोफत शिक्षणाची कर्ज माफ करावे, तात्काळ शिक्षक भरती करुन डीएड व बीएड धारकांना न्याय दयावा, शेतीविषय अभ्यासक्रमात समाविष्ठ करावे, या मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा जिल्ह्यासह राज्यात चळवळ उभारणार असल्याचा इशारा विद्यार्थी सूकाणू समितीने दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*