Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जलकुंभ दुर्घटना : सम्राट ग्रुपचे सुजॉय गुप्ता यांचा अटकपूर्व जामिन न्यायालयाने फेटाळला

Share

नाशिक । प्रतिनिधी

सातपूरजवळील ध्रुवनगरमध्ये सुरू असलेला सम्राट ग्रुपच्या ‘अपना घर’ गृहप्रकल्पाच्या ठिकाणी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी फुटून परप्रांतीय मजुर महिलेसह चौघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संचालक सुजॉय गुप्ता यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे गुप्ता यांना केव्हाही अटक होण्याशी शक्यता आहे.

जलकुंभ दुर्घटनेप्रकरणी चौघांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्यामुळे मुख्य संशयित व सम्राट गृपचे चेअरमन सुजॉय गुप्ता आणि चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुजॉय गुप्ता यांच्या अटकपूर्व जामिनावर आज नाशिकच्या न्यायालयात सुनावणी होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

सम्राट ग्रुपच्या या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी गेल्या मंगळवारी (दि.2) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास फुटली होती. यात टाकीजवळ आंघोळ करणारे तीन मजुर व कपडे धुणार्‍या महिलेच्या अंगावर टाकीचा ढिगारा पडून मृत्यु झाला तर एक मजुर जखमी झाला होता.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन ठेकेदार भाविन पटेल, आशिष सिंग, सचिन शेवडे व नारायण कडलग यांना अटक केली तर मुख्य संशयित सुजॉय गुप्ता पसार झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!