सुजॉय घोष लवकरच मराठी सिनेमा लिहिणार!

0

हिंदी चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक सुजॉय घोष लवकरच मराठी सिनेमा लिहिणार आहेत.

सुजॉय घोष यांनी ‘कहानी’, ‘कहानी २’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

अभिनेता रितेश देशमुखने सोशल नेटवर्किंग साईटवर ही माहिती दिली आहे.

सुजॉयनं लवकरच मराठी सिनेमा लिहिणार असल्याचं वचन दिलं आहे, अशा शब्दांत रितेशनं ट्विटरवर ही माहिती दिली.

या पोस्टबरोबर त्यानं सुजॉयचा फोटोही शेअर केला आहे. रितेश पुढे म्हणतो, ‘या भल्या गृहस्थाला मी नुकताच कॉफीसाठी भेटलो. तेव्हा मराठी सिनेमासाठी स्क्रिप्ट लिहिण्याचं वचन त्याने मला दिलं आहे. या सिनेमाची निर्माती जेनेलिया देशमुख यांची असेल.’

रितेश मराठी सिनेनिर्मितीत सक्रिय झाला असून दरवर्षी एकतरी मराठी सिनेमा करायचा या विचारातून तो सिनेमांवर काम करत आहे

 

LEAVE A REPLY

*