Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

मला पराभूत करण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते एक झाले होते- डॉ. सुजय विखे

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- माझा हट्ट पुरवण्यासाठी नगर जिल्हा खंबीर आहे. मला दुसर्‍या आजोबाची गरज नाही, राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा मी तिसरा उमेदवार आहे. भाजप आणि विखे यांची ताकद काय असते हे जिल्ह्याने दाखवून दिले आहे. अशा शब्दात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, संघर्षाच्या राजकारणात हा सर्वात मोठा विजय आहे. मला पराभूत करण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे नेते एक झाले होते. मात्र जनतेने मला कौल दिला. आम्हा कुटुंबाला अनेक संकटातून जावे लागले हा विजय स्वर्गवासी बाळासाहेब विखे यांना श्रद्धांजली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी माझी उमेदवारी डावलली त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

त्यांच्यामुळेच मी भाजप मध्ये आलो. नातू म्हणून हट्ट पुरवण्यासाठी मला दुसर्‍या आजोबाची अजिबात गरज नाही जिल्ह्यातील जनतेनेच माझे हट्ट पुरवले आहेत. गोरगरीब जनता सर्वसामान्य कर्मचारी यांना या विजयाचे श्रेय जाते तसेच आमदार पालकमंत्री नगरसेवक यांनीही मला स्वीकारले. पक्षात नवीन असूनही भावाप्रमाणे प्रेम केले. सर्वजण एकत्रित राहिले त्यामुळे हा विषय शक्य झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वास सार्थ केला उद्धव ठाकरे यांनी उत्तर जिल्ह्याची जबाबदारी दिली, ती देखील यशस्वीरित्या पार पाडली. नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत एक हाती सत्ता आली आहे.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यात यश येईल. अच्छे दिन आले असल्यामुळे, आता वडिलांनाही भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह करेल इकडे एवढे चांगले असताना तीकडे राहण्यात अर्थच नाही, यासाठी त्यांनी भाजपमध्ये यावे असा माझा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे नगर शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. नगर शहरामध्ये नवीन उद्योग यावेत हा शब्द मी दिलेला आहे तो मी पूर्ण करेल परंतु जनतेला आता दडपशाही खाली जगावं लागणार नाही माझा संघर्ष काँग्रेसबरोबर कधीच नव्हता काँग्रेसने आमच्या कुटुंबाला खूप काही दिले. आमचा संघर्ष नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिलेला आहे, आणि तो यापुढेही राहील असे डॉक्टर सुजय विखे म्हणाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!