वडिलांच्या इच्छेविरूद्ध निर्णय घेतला, आता भाजपा वाढविण्याचे काम – डॉ.सुजय विखे

0
मुंबई : विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपचा रस्ता धरला आहे. मंगळवारी मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे मोठे नेतेमंडळी उपस्थित होते.

 प्रवेशानंतर डॉ.सुजय विखे म्हणाले… 
-कार्यकर्ता म्हणून जागा दिली, याबद्दल भाजपा आणि मुख्यमंत्र्यांचे आभार
-अनेक दिवसांपासून हा विचार मनात होता.
-पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खंबीर नेतृत्वाचा प्रभाव होता. त्यामुळे भाजपा प्रवेश, पुढील वाटचालीसाठी हाच योग्य मार्ग.
-राजकारणात अनेकदा संकटे आली. पण मुख्यमंत्री सातत्याने सोबत, त्यांनी साथ दिली व मदत केली.
-नगर जिल्ह्यात भाजपा वाढवणार, असा शब्द देतो.
-हा निर्णय वडिलांच्या इच्छेविरूद्ध घेतला.
-कुटुंबाच्या विरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागला.
-नगर जिल्हातील दोन्ही खासदार युतीचे असतील.
-स्थानिक नेत्यांविरूद्ध राजकारणात असल्याने काही बोलावे लागले, त्यांनी आता मुलगा म्हणून सांभाळून घ्यावे.

……..

भूकंपाचे कंपने 48 मतदारसंघात- ना.शिंदे

यावेळी नगरचे पालकमंत्री राम शिंदे म्हणाले….
– नगर राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
– याची कंपने पुढील काळात लोकसभेच्या 48 मतदारसंघात पसरणार आहेत.
-आता जिल्ह्यातील दोन्हा जागांना ‘कार्यक्रम’ आम्ही व्यवस्थित पार पाडू
-डॉ.सुजय यांना त्यांच्या पालकांचा लवकरच आशिर्वाद मिळेल. त्यांचे अंतर्मन आपल्यासोबत आहे.

डॉ.सुजय यांना उमेदवारी – मुख्यमंत्री

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले….

– डॉ.सुजय यांचे पक्षात स्वागत करतो.
– त्यांचा निर्णय योग्य होता, हे त्यांच्या घरीही लवकरच पटेल.
-त्यांचा प्रवेश हा पक्षासाठी आनंदाचा क्षण आहे.
-त्यांचे युवा नेतृत्व खंबीरपणे समोर येईल.
– पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डकडे उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची शिफारस करणार आहे.

LEAVE A REPLY

*