Blog : मन आकाशी आकाशी : अग्निपंखी किंवा रोहित

0
नाशिक (सुजाता बाबर) | दिवाळी नंतर नाशिकमध्ये या पक्ष्यांची रेलचेल सुरु होईल. यावर्षी मात्र कधी नाही ते मोठ्या संख्यने हे पक्षी पावसात देखील आले होते. हा सगळा वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम!

दिसायला अतिशय सुंदर! अगदी नावाप्रमाणे अग्निपंखी! याचे इंग्रजी नाव फ्लेमिंगो आणि लोकप्रिय नाव विंग्ज ऑफ फायर. उडताना या पंखांमध्ये खरेच आग धगधगते आहे असेच वाटते.

हा पक्षी अक्षरशः वेड लावतो. दिसायला अतिशय देखणा, आकाराने मोठा. भव्य पंख आणि लाल भडक रंग. हे सगळेच विलक्षण असते. शिवाय यांचे मोठे थवे असतात. त्यामुळे सगळेच मोहवून टाकणारे असते. विशेषतः यांचे उड्डाण आणि पाण्यामध्ये उतरणे हे देखील तासनतास बघत राहावे असे वैशिष्ट्यपूर्ण असते. यामुळे फोटोग्राफर्सचा हा अत्यंत प्रिय पक्षी आहे.

 

हा पक्षी अगदी हुशार आहे. तो अशा ठिकाणी राहतो जिथे इतर पक्षांचे अन्न फारसे उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी इतर शिकारी पक्षी फारसे येत नाहीत आणि त्यामुळे ते स्वतः सुरक्षित राहतात

यांची चोच म्हणजे एक प्रकारची गाळणी असते. ते जेव्हा अन्न चोचीने उचलून घेतात तेव्हा त्यात त्यांचे मुख्य अन्न, चिखल आणि पाणी असते. यामध्ये पाणी व माती ते बाहेर टाकून देतात व अन्न म्हणजे मासा किंवा शैवाल फक्त आत घेतात.

या शैवालामध्ये आणि प्लँक्टनमध्ये बीटा कॅरोटीन असते. यामुळे रोहित पक्ष्यांचे पंख लाल गुलाबी असतात. जेवढे अधिक बीटा कॅरोटीन तेवढे त्यांचे पंख गुलाबी लाल असतात.

तुम्ही जर शेकडो रोहित पक्ष्यांचा थवा पाण्यामध्ये फिरताना पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हे एक सुंदर नृत्य असते. गंमत म्हणजे एखाद्या समूह नृत्याप्रमाणे हे पक्षी अगदी एकसारखे नृत्य करीत असतात.

LEAVE A REPLY

*