अहमदनगर|Ahmedagar
लघुशंकेसाठी थांबलेल्या मालट्रक चालकाला चाकूचा धाकू दाखवून 25 हजार रूपयाला लुटले. नगर- औरंगाबाद रोडवरील गजराजनगर येथे भरदुपारी ही घटना घडली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक तुकाराम महादेव झिरपे (वय- 38 रा. कोळगाव ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक घेऊन नगर- औरंगाबाद रोडने चालले होते. त्यांनी गजराजनगर येथे लघुशंकेसाठी मालट्रक उभा केला. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांमधील मध्ये बसलेल्या एकाने फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखविला. फिर्यादी यांच्या खिशातील 25 हजारांची रोख रक्कम काढून घेत पळ काढला. फिर्यादी यांनी याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर करीत आहे.