आत्महत्याग्रस्त 7 शेतकर्‍यांचे प्रस्ताव मंजुर

0
नातेवाईकांना मिळणार 1 लाख रुपयांची मदत
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या 28 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होते. त्यापैकी 7 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून संबधितांच्या नातेवाईंना एक लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. यामध्ये 6 प्रस्ताव दक्षिणेतील आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने 12 प्रस्ताव अपात्र तर 8 पुन्हा फेरचौकशीसाठी पाठवले आले आहे. 1 प्रस्ताव शासन सतरावर प्रलंबित आहे. जिल्हाधिकर्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्राप्त प्रस्तावांची छाननी झाली.

पात्र ठरलेली तालुकानिहाय प्रकरणे- कर्जत-प्रकाश बाळासाहेब थोरात (कुळधरण),पाथर्डी- जिजाबा शंकर झाडे (मिरी), धोंडीबा विठोबा ससाणे (सोनोशी), जामखेड-दिगंबर एकनाथ कारंडे (हसनाबाद), अकोले-मुरलीधर धोंडु भांगरे (साकीरवाडी), श्रीगोंदा- विलास किसन दांगडे (घुगवडगाव), लक्ष्मण गेणबा पाचपुते (काी) आदी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रकरण मंजुर झाले असून संबधितांच्या नातेवाईकांना मदत मिळणार आहे.बुधवार 28 रोजी आयोजीत शेतकरी आत्महत्या बैठकीला जिल्हाधिकारी अभय महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा कृषी अधिक्षक पंडीत लोणारे,जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे प्रतिनिधी, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर आदी उपस्थित होते.
…………….
मंजुरी मिळाल्यास तात्काळ मदत
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रस्ताव मंजुर झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते. तहसिलदार यांच्याकडून प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी टंचाई शाखेला प्राप्त होतो.त्यानूसार प्रांताधिकारी व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्हास्तरीय समितीपुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जातो.
…………
प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्र
आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांचा प्रस्तावासाठी मयत शेतकर्‍यांच्या नावे जमिन, कर्जबाजारी असल्यास तगादा केल्याची नोटिस, सततची नापिकी असल्याचा अहवाल, पंचनामा याशिवाय इतर कागदपत्र आवश्यक आहे.
……………

LEAVE A REPLY

*