ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संचालकाने गोळी झाडून घेत आत्महत्याचा प्रयत्न

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरमधील सावंत ट्रान्सपोर्टचे संचालक अभिजीत सावंत यांनी गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरजवळील चांदबीबी महालावर हा प्रकार घडला असून त्यांच्यावर नगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात मार्केट परिसरामध्ये अभिजीत यांचे सावंत ट्रान्सपोर्ट नावाचे मोठे कार्यालय येथे आहे. सायंकाळच्या सुमारास ते चांदबीबी महाल परिसारात गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी स्वतःवर दोन गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना नगरमधील एका बड्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*