स्वतः गोळी झाडून घेणार्‍या व्यावसायिकाचा मृत्यू

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जबाजारीपणामुळे स्वतः गोळी झाडून घेणारे नगरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अभिजीत सावंत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभिजीत सावंत काही दिवसांपासून अस्वस्थ होते. बुधवारी त्यांनी दुपारी चारच्या सुमारास स्वतःकडील पिस्तूल घेऊन चाँदबिबी महाल गाठले. तिथे त्यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून गोळ्या झाडून घेतल्या. गोळीबाराच्या आवाजाने चाँदबिबी महालावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी त्यांना सावंत हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांना संपर्क साधून पोलिसांनी झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सावंत यांना नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सावंत यांच्यावर उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना जीवनवाहिनीकेचा आधार दिला होता.पण काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

LEAVE A REPLY

*