‘एफआरपी’नुसार ऊस दराचा लवकरच निर्णय; ‘वसाका’कार्यस्थळी सहकार मंत्र्यांचे आश्वासन

0
लोहोणेर | राज्यातील सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून शासनाने कल्याणकारी धोरण राबविण्याचे ठरवले असून,

या पार्श्वभूमीवर उसाचे दर एफआरपीप्रमाणे निश्चित करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देत ऊस उत्पादकांनीही आधुनिक तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतीचे तत्व स्वीकारत कमी क्षेत्रात जास्त उसाचे उत्पादन घेण्यासाठी पाऊले उचलावीत, असे आवाहन राज्याचे सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील 11 हजार 111 व्या साखर पोत्याचे पूजन करण्यासाठी वसाका कार्यक्षेत्रावर आज झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी ‘वसाका’चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर होते. ना. देशमुख म्हणाले, उसाचे दर व साखरेचे भाव यात तफावत जाणवत असूूून, सहकारी कारखाने टीकवणे गरजेचे असताना त्यावर मात करत ‘वसाका’ चालू केला ही बाब इतर कारखान्यांसाठी प्रेरणादायी आहे.

राज्यातील काही कारखान्यांच्या उसाच्या वजनकाट्याबाबतच्या तक्रारींची दखल घेत कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन पद्धतीने साखर आयुक्त कार्यालयाशी जोडले जावून, त्याचा दैनंदिन अहवाल घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रास्ताविक आ. डॉ. राहुल आहेर यांनी केले. मुंबई सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या भवितव्यासाठी कारखाना टिकला पाहिजे, तो चालला पाहिजे यासाठी मुंबई बँक आपल्या पाठीशी कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील निफाड, नाशिक व रानवड या साखर कारखान्यांनाही सहाय्य करावे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रश्न लवकर सुटण्याठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी आ. जे. पी. गावित, माजी आ. दिलीप बनकर, प्राधिकृत अधिकारी केदा आहेर, धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, अभिमन पवार, राजेंद्र बकाल, जि.प.चे गटनेते, चांदवड बाजार समितीचे सभापती आत्माराम कुंभार्डे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, विकास देशमुख, सहकार आयुक्त मिलिंद भालेराव, पणनचे संचालक सुनील पवार, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, संतोष मोरे, रामदास देवरे, जि. प. सदस्य नितीन पवार, कौतिक पवार, पं. स. सदस्य पंकज निकम, देवळा बाजार समितीचे सभापती आशिक आहेर, विलास देवरे, राजेंद्र देवरे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी ना. देशमुख व प्रवीण दरेकर यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. कार्य. संचालक बी. डी. देसले यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमासाठी मोहन शर्मा, अ‍ॅड. एकनाथ पगार, भरत पाळेकर, बाबुराव पाटील, वसंतराव निकम, अण्णासाहेब शेवाळे, बाळासाहेब आहेर, अतुल पवार, साहेबराव चव्हाण, गोविंद पगार, कुबेर जाधव, कृष्णा बच्छाव, महेंद्र हिरे, अशोक भोसले, सुनील देवरे, केदा शिरसाठ, नारायण हिरे, सुभाष शिरोडे, प्रभाकर पाटील, माधवराव पवार, अशोक भोसले, अशोक पवार, नानाजी सूर्यवंशी, साहेबराव सोनवणे, रमेश देवरे, अण्णा अहिरे, श्रीधर कोठावदे, गंगाराम सूर्यवंशी, दिनेश देवरे, कैलास बोरसे, माणिक निकम, दगडू भामरे, साहेबराव सूर्यवंशी अशोक देेेवरे आदींसह कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*