ऊस उत्पादकांनी एकरी 100 टन उत्पादन घ्यावे : आ. थोरात

0

दिवाळीत अमृतउद्योग समूहाकडून सुमारे 100 कोटी बाजारात

संगमनेर (प्रतिनिधी) – नवीन कारखान्यामुळे तालुक्याच्या विकासात नवीन पर्व सुरू झाले आहे. सरासरी उत्पादकता वाढविल्यास सर्वोत्तम भाव मिळणार असून ऊस उत्पादकांनी एकरी 100 टन उत्पादन घ्यावे असे आवाहन माजी महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2017-18 या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे होते.
व्यासपीठावर बाजीराव पा. खेनमर, कांचनताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मणराव कुटे, बाबा ओहोळ, अजय फटांगरे, निशाताई कोकणे, प्रवीण गोयीखेडकर, गिरीश कराळे, अतुल गोयीखेडकर, चंद्रकांत कडलग, हरिभाऊ वर्पे, पांडुरंग कोकणे, संपतराव डोंगरे, आर. बी. रहाणे, प्रकाश कलंत्री, राजेंद्र गुंजाळ, प्रदीप मालपाणी, साहेबराव गडाख,
सीताराम राऊत, विश्‍वासराव मुर्तडक, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ. थोरात यांच्या हस्ते एकरी उच्चांकी ऊस उत्पादन घेणारे शंकर वाकचौरे, भिका घुले, मधुकर काळे, गोरक्षनाथ येवले, शंकर वाकचौरे, भाऊसाहेब येवले, माधव तोरमल, बाळकृष्ण होडगर, वसंतराव थोरात, लताबाई गुंजाळ, मधुकर नवले, संभाजी तांबे यांचा ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा पुरस्काराची रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्ष अ‍ॅड. कानवडे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या प्रगतीची नेत्रदीपक वाटचाल सुरु आहे. या कारखान्याने शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक व इतर घटकांच्या जीवनात समृध्दी आणली आहे. नवीन कारखान्याचा मागील ट्रायल सिझन चांगला झाला आहे. यावेळी सर्वत्र पाऊस चांगला आहे. चांगल्या सिझनसाठी अनुकूलता आहे.
नवीन कारखान्यामुळे साखर शुभ्र दाणेदार व अधिक गुणवत्तेची मिळणार आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. थोरात कारखान्याला साखर फेडरेशन कडून 70 कोटींचे कर्ज, पर्यावरणाची ना हारकत व वीज मंडळाशी करार झाल्यानंतर सर्व योजना बंद झाल्या आहेत.
परमेश्‍वरीही आशीर्वाद लाभला आहे. कारखान्याने सभासदांसाठी अपघाती विमा दोन लाख रुपये केला आहे. 10 ते 12 ऑक्टोबर काळात मोफत साखर वाटप होणार असून 8 ऑक्टोबरपर्यंत 100 रुपये पेमेंट प्रमाणे बँकेत वर्ग होणार असल्याचेही ते म्हणाले.
प्रास्ताविकातून कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले, कारखान्याने कामगारांसाठी 15 टक्के पगारवाढ करुन मेडीक्लेम पॉलिसी मृत निधी सुरु केला आहे. कारखान्याने कायम सभासद, ऊस उत्पादक व कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले असून हा हंगाम यशस्वी होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी ज्येष्ठ सभासद रामकृष्ण काकड, शिवाजी तांबे, लालाभाई शेख, बाळकृष्ण दातीर, तुकाराम घुगे, बाबूराव शिंदे, बाळासाहेब देशमुख, विश्‍वनाथ घोलप, नामदेव साबळे, आनंदराव गुंजाळ, गुलाब भरीतकर यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन तसेच चंद्रकांत कडलग, वैशालीताई कडलग, गणपत सांगळे, मंदाताई सांगळे, रोहिदास पवार, मनिषाताई पवार, संतोष हासे, मनिषा हासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी पांडूरंग पा. घुले, शांताबाई खैरे, मीराताई शेटे, सुनंदा जोर्वेकर, निर्मलाताई गुंजाळ, अर्चना बालोडे, शांताबाई वाकचौरे, गोजराबाई जोंधळे, आर. बी. सोनवणे, केशवराव मुर्तडक, सीताराम वर्पे, संपतराव गोडगे, बाळकृष्ण दातीर, खेमचंद निहलानी, हनुमंता खेमनर, किशोर टोकसे, नितीन अभंग, बाळासाहेब पवार, बापूसाहेब गिरी, बाळासाहेब शिंदे, मीनानाथ वर्पे, जगन आव्हाड,
अभिजीत ढोले, नवनाथ आंधळे, रमेश गुंजाळ, सुरेश थोरात, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब मोरे, अनिलराव देशमुख, केशव दिघे, राजेंद्र कढणे, दत्तू खुळे, किरण कानवडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सर्वांची दिवाळी आनंदात साजरी होईल  –  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारी संस्था मुलांप्रमाणे जपल्या. हीच परंपरा आपण पुढे सुरू ठेवली आहे. कारखान्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्था सर्वोत्तम काम करीत आहे. 5500 मेट्रिक टन क्षमतेचा नवीन कारखाना 14 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करू शकतो. सोबत वीज निर्मिती प्रकल्पामुळे कारखान्याच्या उत्पादनात वाढ होईल. यासाठी ऊस उत्पादकता वाढली पाहिजे. शेतकर्‍यांनी एकरी किमान 100 टन मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठेवून काम करावे. आधुनिक पद्धतीचा वापर करा, चांगली उत्पादकता, चांगली रिकव्हरी व चांगला भाव मिळवून देईल. कारखान्याच्या हंगामात अनेक चाके फिरत असतात. सर्व हंगाम निर्विघ्न पार पाडण्यासाठी ईश्‍वराचे आशीर्वाद ही महत्त्वाचे असतात. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने ऊस लागवड वाढवावी. कार्यक्षेत्राबाहेरील शेतकरी बांधवांचा आपल्या कारखान्यावर मोठा विश्‍वास आहे. राष्ट्रीय पातळीवरचा साखर निर्यातीचा पुरस्कार मिळाला हे कौतुकास्पद असून कर्मचार्‍यांसाठी 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असून राजहंस दूध संघाचे रिबेट, अनामत, बोनस यांसह अमृत उद्योग समूहातून सुमारे 100 कोटी रुपये दिवाळी निमित्त बाजारात येणार असल्याने सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी आ. थोरात यांनी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

कामगारांना दिवाळी निमित्त 20 टक्के बोनस; 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान –  थोरात कारखान्याने शेतकरी, सभासद व कामगार हा आपला परिवार मानला असून सतत त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. यावर्षी दिवाळी निमित्त कामगारांना 20 टक्के बोनस 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याने सर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

*