Thursday, April 25, 2024
Homeनगरसाखर कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा समन्वय समितीची स्थापना

साखर कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा समन्वय समितीची स्थापना

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील साखर कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी साखर कामगारांची जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस आनंदराव वायकर यांनी दिली.

जिल्ह्यातील साखर कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात येथील श्रमिक कार्यालयात बुधवार दि.25 डिसेंबरला बैठक झाली. ज्येष्ठ साखर कामगार नेते अविनाश आपटे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्ह्यातील साखर कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत साखर कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी साखर कामगारांच्या जिल्हा समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.

- Advertisement -

समितीच्या सल्लागारपदी अविनाश आपटे व कॉ. आनंदराव वायकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच समितीचे अध्यक्ष म्हणून ज्ञानदेव आहेर पाटील, कार्याध्यक्ष म्हणून किसन कोलटकर, सरचिटणीस म्हणून शरद नेहे यांची निवड करण्यात आली. शिवाजी औटी, निवृत्ती मते, विष्णुपंत टकले, मच्छिंद्र फोपसे, दत्तात्रय आंत्रे, भरत पेरणे, बाळासाहेब ढोकणे, निवृत्ती तांबे, रामदास रहाणे, सोमनाथ ताजणे, संदीप मालुंजकर, पोपट वाणी, गोरख चेडे, रवींद्र तांबे, रोहिदास कैदके, नंदू गवळी यांची समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी येत्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर जाऊन कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या