Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात साखर उत्पादन 46 लाख टनांनी घटले

महाराष्ट्रात साखर उत्पादन 46 लाख टनांनी घटले

सार्वमत

पुणे – इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये 15 एप्रिल, 2020 पर्यंत 60.12 लाख टन साखर उत्पादन करण्यात आले, तर गेल्या हंगामात या कालावधीत हे उत्पादन 106.71 लाख टन इतके होते. याचाच अर्थ राज्यात 15 एप्रिलपर्यंत 46.59 लाख टन इतके उत्पादन कमी झाले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात सध्या 10 पेक्षा कमी साखर कारखाान्यात गाळप सुरु आहे. एकूण 146 साखर कारखान्यांपैकी 67 खाजगी आणि 79 सहकारी कारखान्यांनी महाराष्ट्रात 2019-20 च्या गाळप हंगामात भाग घेतला होता. आता महाराष्ट्रातील साखर कारखान्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

या हंगामात महापूर, दुष्काळ आणि आता कोरोना संकटामुळे ही कारखान्यांची गती मंदावली आहे. या हंगामात राज्यातील साखर उत्पादनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील कारखान्यांचे गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन कमी झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या